मावळ ऑनलाईन –गावठी हातभट्टीसाठी लागणारे तब्बल दोन हजार लिटर कच्चे रसायन बेकायदेशीररीत्या (Ambi)साठवून ठेवणाऱ्या एका महिलेला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवार (२२ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंजारभट वस्ती, आंबी गाव (ता. मावळ) येथे करण्यात आली.
या प्रकरणात अभिती निर्दन मनावत (२०, आंबी गाव, कंजारभट वस्ती, मावळ) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिच्या ताब्यातून २,००० लिटर कच्चे रसायन असलेली प्लास्टिक टाकी जप्त केली असून त्याची एकूण किंमत सुमारे १ लाख २ हजार रुपये आहे.
Talegaon Dabhade: मावळातील ७१२ कोटी १७ लाख रुपयांच्या भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
Bavdhan Crime News : भरधाव इको गाडीच्या धडकेत दोन तरुण गंभीर जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या उद्देशाने हे कच्चे रसायन साठवून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.



















