Team MyPuneCity –आळंदी येथील कचरा डेपोला दि .२० रोजी दुपारी 3 च्या सुमारास भीषण आग (Alandi News)लागली. त्या घटनेची माहिती अग्निशमन दलास स्थानिक नागरिकाने दिली.तत्काळ आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल गाडी घटना स्थळी पोहचून आग आटोक्यात आण्याचे परिश्रम करत होते.आगीचे स्वरूप मोठे असल्याने चाकण नगरपरिषद अग्निशमन दल, राजगुरूनगर नगरपरिषद अग्निशमन दल , वडगांव मावळ नगर पंचायत अग्निशमन दल व पिएमआरडी अग्निशमन दलाच्या गाड्याना पाचारण करण्यात आले. त्या घटना स्थळी पोहचत तेथील आग आटोक्यात आण्याचे साठी परिश्रम करत होत्या. परंतु संध्याकाळी 7 ला अंधारा मुळे तसेच कचरा डेपो येथील प्रवेश द्वारा जवळच कचऱ्याचे मोठे ढीग व त्या जवळील कचऱ्यास आग लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना आगीच्या ठिकाणी जाण्यास मोठा अडथळा नर्माण होत होता.यामुळे सायंकाळी 7 ला आग विझविण्याचे काम तूर्तास थांबविण्यात आले होते.कचरा डेपो येथील भाग हा डोंगराळ भाग असल्याने, कचरा डेपोच्या आगी जवळ जाण्यास अडचणी आल्याचे दिसून येत होते.

तदनंतर अजून ६० तास लोटून ही कचरा डेपो येथील आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.प्रवेश द्वार जवळ कचऱ्याचे ढीग तसेच आगी मुळे कचरा जळाल्याने राखेचे ढीग त्यात थोडी फार आग असल्याने अग्निशमन दलास शेवटच्या टोकास जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.तसेच शहरातील नव्याने संकलित केलेला कचरा वर्गीकरण न करता प्रवेशद्वार जवळ आगीच्या जवळच्या ठिकाणी टाकला जात आहे.तो पुन्हा जळत आहे.याकडे पालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
Wakad police : कार चालकाला लुटून पळालेल्या चोरट्याला पाठलाग करून पकडले

आगी मध्ये कचरा डेपो मध्ये पलिकीचे किती नुकसान झाले? कचरा डेपो तील आवश्यक विविध लोखंडी मशनरी सुरक्षित बाहेर काढल्या की नाहीत ?कचरा वर्गीकरण करताना लोखंड,प्लास्टिक,कागदी पुठ्ठे इ.वस्तू नुकसान,संकलन करण्यात आलेले खत याबाबत अजून कोणतीच माहिती पलिकिने प्रसारित केली नाही.
Vasant Lecture Series : व्यक्तीला कौतुकाची थाप गरजेची असते – मधुराणी गोखले प्रभुलकर

पत्र्या शेड मध्ये मागे लोखंडी मशीन होत्या सद्यस्थितीत मशीन नाही.आग लागल्या मुळे ठिक ठिकाणी राखेचे ढीग दिसून येत आहेत.