Team MyPuneCity –संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव सोहळा आळंदी मध्ये सुरू आहे.यातच केळगाव रोड येथील सुलभ शौचालयात भाविकांची लूट चालू असल्याचा प्रकार मंगेश तीताडे यांनी उघडीस आणला आहे.
जन्मोत्सव सोहळ्या निमित्त नगर परिषदेच्या वतीने जाहीर केले होते की,सुलभ शौचालय मोफत उपलब्ध आहे.तरी केळगाव रोड येथील सुलभ शौचालयातील ठेक्केदार प्रत्येक व्यक्तीकडून जादा दराने पैसे आकारत असून त्यावर कोणाचा अंकुश नाही. स्नानासाठी २० रू.व टॉयलेट १०रू. आकारतात. कॅश नसेल तर ऑनाइन पेमेंट करायला लावत आहे.असे लिहीत त्यांनी ऑनलाईन कॅश दिल्याचा पुरावा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Pune People’s Bank : पुणे पीपल्स बँकेच्या तळेगाव शाखेचा मंगळवारी रौप्य महोत्सव सोहळा
त्या आधीच दोन दिवसा पूर्वी काही भाविकांनी केळगाव रस्त्यावरील सुलभ शौचालयात सोहळ्या निमित्त आलेल्या भाविकांकडून पैसे घेतल्याची तोंडी तक्रार पालिका अधिकाऱ्याकडे केली होती.तत्काळ मुख्याधिकारी यांनी भाविकांसाठी ते सुलभ शौचालय मोफत उपलब्ध असल्याचे जाहीर केले होते.परंतु अधिकाऱ्यांच्या सूचना डावलत तेथील ठेक्केदारा कडून भाविकांची लूट होत आहे.
Pune: प्रतिभावान, हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन ‘प्रतिबिंब’