situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi Chief Officer : आळंदी नगरपरिषदेत खांदेपालट; कैलास केंद्रे यांची लातूर महापालिकेत बदली, माधव खांडेकर नवे मुख्याधिकारी

Published On:
Alandi CO
---Advertisement---

Team MyPuneCity – आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (Alandi Chief Officer) कैलास केंद्रे यांची लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नती झाली असून, नातेपुते नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर हे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

केंद्रे यांचे विकासात्मक कार्य

कैलास केंद्रे यांच्या कार्यकाळात (Alandi Chief Officer) आळंदीत विविध विकासकामे पार पडली. सिद्धबेट परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जैविक खतांचा वापर, पाण्याची सोय, स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. तसेच, कार्तिकी व आषाढी वारीच्या वेळी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली.

शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने शिवस्मारक परिसरातील अतिक्रमण हटवून शिवसृष्टी तयार करण्यात आली. चाकण चौकात कचऱ्याचे साम्राज्य हटवून तुळशवृंदावन निर्मिती, श्री भैरवनाथ चौकामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व चांगदेव भेट शिल्प, तसेच हरिपाठ बाल उद्यान उभारण्यात आले. पालिका चौकात आकर्षक कमान, टाऊन हॉलचे नूतनीकरण, तसेच नगरपरिषद शाळेच्या इमारतींमध्ये अंतर्गत विकासकामे करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी चित्रभिंती आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

केंद्रे यांच्या कार्यकाळात इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा व अनेक वर्षे रखडलेला एसटीपी प्रकल्प प्रगतीपथावर आला. तसेच, शाळा क्रमांक ४ ची इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या सर्व विकासकामांमुळे कैलास केंद्रे (Alandi Chief Officer) हे आळंदीकरांच्या आठवणीत राहतील.

Extension for HSRP installation : जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्याची तीन महिने मुदतवाढ, वाहनमालकांना मोठा दिलासा

माधव खांडेकर यांचा अनुभव

आळंदीच्या नव्या मुख्याधिकारीपदाचा (Alandi Chief Officer) कार्यभार स्वीकारणारे माधव खांडेकर यांना नातेपुते आणि माळशिरस येथील वारी नियोजनाचा अनुभव लाभला आहे. त्यामुळे आळंदीतील वारी व्यवस्थापनात त्याचा निश्चित फायदा होणार आहे. वारी काळात त्यांनी नाविन्यपूर्ण सुविधा, स्वच्छता, महिला वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा आणि हिरकणी कक्ष यांसारख्या सुविधा पुरवल्या होत्या.

नातेपुते शहरातील अतिक्रमण दूर करून राष्ट्रीय स्मारकांना मोकळा श्वास घेता आला. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत त्यांच्या कार्यकाळातील कामे विशेष लक्षवेधी ठरली. तसेच, खांडेकर हे सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांच्या ‘बाप खर्ची पडला’ या कवितेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Harmony School of Sitar : नेहा महाजनच्या सतारवादनाने रसिक मंत्रमुग्ध

बाप खर्ची पडला

बापानं सारं झिजून जायाचं असतं
कुटुंबासाठी राब राब राबायचं असतं
स्वतःसाठी काही शिल्लक रहायचं नसतं

म्हणेल कोणी चालूय सगळं
म्हतार पणाच्या सोयी साठी
पण तू आपलं चालू दे
काळजांच्या तुकड्यासाठी

काळजाचं पाणी केलास तरी
कर्तव्य नाव त्याला ठवतील लोक
विसरतील पहायला झिजून झिजून
तुझ्या काळजाला पडलेलं भोक

बचती साठी घेतला चिमटा
नाही खाल्ला पोटाला तुकडा
तरी झटतो रात्रंदिन घ्यावया
पोरा बाळा ब्रँडेड कपडा

ज्वानी गेली स्वप्न पाहण्यात
अन म्हातारपण हुरहूर न्यात्
आयुष्य गेलं लेकरांच्या पायी झुर न्यात

जसा हातापायाचा कंप झाला
तसा गोतावळा लांब झाला
बेरजेचा हिशोब चुकला
बाप सारा खर्ची पडला

मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या पदोन्नतीबद्दल आणि माधव खांडेकर यांच्या नवीन कार्यभाराबद्दल (Alandi Chief Officer) प्रसाद बोराटे यांनी अभिनंदन केले आहे.

 

Follow Us On