मावळ ऑनलाईन – नागपूर येथे झालेल्या पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेत ॲड्.पु. वा. परांजपे विद्या मंदिराची आठवी वी अ मधील अष्टपैलू खेळाडू कु.ईश्वरी मोहन झिंजुरके या विद्यार्थीनीने ३३ किलो वजनी गटात महाराष्ट्रातून ब्रॉझ पदक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
मुख्याध्यापक .पांडुरंग पोटे ,पर्यवेक्षिका रेखा भेगडे, वर्गशिक्षिका सुषमा दाते , सर्व शिक्षक यांनी ईश्वरीचे कौतुक केले.

ईश्वरीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी.राज्यमंञी .संजय तथा बाळाभाऊ भेगडे साहेब ,उपाध्यक्ष गणेश खांडगे साहेब,संस्थेचे सचिव संतोषजी खांडगे,सहसचिव परांजपे विद्यालयाचे अध्यक्ष नंदकुमार शेलार ,खजिनदारराजेश म्हस्के व सर्व संस्था पदाधिकारी यांनी ईश्वरी व तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक विशेष कौतुक व अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.