मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापक महाविद्यालयातील ( Adhyapak Mahavidyalay) ग्रीन क्लब अंतर्गत पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जागृती अभियान आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयात या निमित्ताने महाविद्यालयातील प्रांगणात फुलझाडांचे रोपण करण्यात आले. या अभियानात विद्यार्थी,प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवृंद उत्साहाने ( Adhyapak Mahavidyalay) सहभागी झाले.
Marathi Sahitya Sanmmelan : 99व्या संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी – उदय सामंत
संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना, संचालक राज खांडभोर, राजेश बाफना,चंद्रकांत ढोरे,दत्ताजी असवले सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी वृक्षारोपणाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच अध्यापक ग्रीन क्लबचे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित ( Adhyapak Mahavidyalay) होते.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन क्लबचे समन्वयक प्रा. सोनाली पाटील व प्रा.ज्योती रणदिवे यांनी केले. कार्यक्रमास बी.एड महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी,तसेच प्रा. महादेव सांगळे,डॉ कविता तोटे,डॉ. संदीप गाडेकर,डॉ.शीतल देवळालकर,प्रा.शबाना मोकाशी, एम.एड.विभागातील डॉ. दिपा नेवसे,प्रा. संध्या घोडके,डॉ. अनामिका कावरे, ग्रंथपाल सुजाता जाधव, मोहन कडू ,सुरेश घोजगे वृक्षारोपण कार्यक्रमास सहभागी होते. तसेच वृक्षारोपण करण्यास संतोष ढमाले,विनायक येळवंडे, रमेश राणे याची मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचे सहकार्य ( Adhyapak Mahavidyalay) लाभले.