मावळ ऑनलाईन – हिंदी चित्रपट सृष्टीतील तरुण अभिनेता तनुज वीरवाणी ( Tanuj Veerwani) याच्या लोणावळ्यातील बंगल्यातून त्याच्याच कामगाराने पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना लोणावळ्याजवळील पाली परिसरातील नेक्स्ट टू गोल्डन लिफ्ट सोसायटी परिसरात घडली आहे. ही चोरी 2 जून ते 13 जुलै 2025 या कालावधीत घडली आहे.
PCU : औद्यागिक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जीईसीचे दुबईमध्ये होणार उद्घाटन
याप्रकरणी तनुज वीरवाणी ( Tanuj Veerwani) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.16) तक्रार दिली आहे तक्रारीवरून पोलिसांनी वीर वाणी यांचा कामगार चुनचुन वासुदेव यादव (वय 28 बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतन यादव हा तनुज वीरवाणी ( Tanuj Veerwani) यांचा कामगार असून तो त्यांच्यासोबतच राहत होता. मात्र वीरवाणी हे त्यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर आले असता त्यांना त्यांचे कपाट उघडे दिसले. ज्यातून 1 लाख 88 हजार रुपयाचे ओमेगा कंपनीचे व 50 हजार रुपयांचे रॅडो कंपनीचे अशी दोन महागडी घड्याळे व 24 हजार 668 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीचा गेल्याचे त्यांना आढळले .
यावरून त्यांनी बुधवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तूर्तास पोलीस यादव यांचा तपास घेत असून, त्याच्या विरोधात मुंबईत देखील काही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.