मावळ ऑनलाईन – देहूरोड छावणी परिषदेच्या हद्दीतील (Roads in Dehu Road Camp) रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः देहूरोड-देहू कमान ते झेंडे मळा या पालखी मार्गावरील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून, पावसाळ्यात या मार्गावरून ये-जा करणे नागरिकांसाठी मोठे संकट ठरले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत, काहींना गंभीर दुखापतही झाली आहे. वाहनचालकांना रस्त्यावरून जाताना अक्षरशः कसरत करावी लागत असून, वाहनांचे नुकसान तसेच मणक्याचे आणि कंबरदुखीचे त्रास वाढले आहेत.
PMC : पुणे महापालिकेत मोठा फेरबदल : उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
लष्करी हद्दीत असलेला हा रस्ता सी.ओ.डी. डेपोतील (Roads in Dehu Road Camp) कामगार आणि सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या मार्गाकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची टीका स्थानिक पातळीवर होत आहे. सी.ओ.डी. डेपोतील अनेक कामगार या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत जखमी झाले आहेत.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सी.ओ.डी. वर्कर्स युनियन देहूरोडच्या (Roads in Dehu Road Camp) वतीने जनरल सेक्रेटरी चंदन आल्हाट आणि उपाध्यक्ष संजय जगदीश डुमडे यांनी कमांडंट, स्टेशन कमांडंट, एम.ई.एस. आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड यांना पत्र देऊन तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, “रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तत्काळ बुजवून सुरक्षित आणि चांगला रस्ता तयार करण्यात यावा,” जेणेकरून नागरिक, सैनिक आणि कामगार यांचे हाल थांबतील.
नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी (Roads in Dehu Road Camp) आहे.



















