मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ( MLA Sunil Shelke ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अखेर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. आज बुधवारी सकाळी तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली.
मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ( MLA Sunil Shelke ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे उपस्थित होते. तिघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर तळेगाव आणि लोणावळा या दोन नगरपालिकांबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला.
PMC : पुणे महापालिकेत मोठा फेरबदल : उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
या करारानुसार लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर तळेगाव दाभाडे नगर परिषद भाजपाकडे राहणार आहे. या वाटपामुळे मावळातील दोन्ही प्रमुख पक्षांमधील मतभेद संपुष्टात येऊन विकासाच्या दिशा ठरविण्यासाठी एकत्रितपणे काम होईल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त ( MLA Sunil Shelke ) केला.
तळेगाव दाभाडे नगरपालिकेत १४ प्रभागांमधून २८ नगरसेवकांची निवड होणार आहे. प्राथमिक चर्चेनुसार, नगराध्यक्षपदाच्या पहिल्या अडीच वर्षांसाठी भाजपाचे संतोष दाभाडे पाटील, तर पुढील अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीचे गणेश काकडे यांना संधी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महायुतीचा निर्णय जाहीर होताच तळेगाव आणि लोणावळा परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “विकास आणि स्थिर नेतृत्वासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरेल,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नेत्यांनी ( MLA Sunil Shelke ) दिली.
दरम्यान, २० ऑक्टोबर रोजी तळेगाव नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी आमदार सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उद्देशून, “मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण एकत्र यावे,” असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला आता प्रत्यक्ष रूप मिळाले असून, मावळच्या राजकारणाला नवे वळण देणारा हा ऐतिहासिक निर्णय ( MLA Sunil Shelke ) ठरला आहे.



















