situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Municipal Council Elections : लोणावळा नगरपरिषद निवडणूक : ठाकरे गटाला धक्का, शहरप्रमुखांसह उपशहरप्रमुख शिंदे गटात

Published On:
Lonavala Municipal Council elections

मावळ ऑनलाईन –लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया ( Lonavala Municipal Council elections) सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक शिवदास पिल्ले तसेच उपशहरप्रमुख नरेश काळवीट यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भगवा झेंडा प्रदान केला. यावेळी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, शहरप्रमुख संजय भोईर, युवासेना नेते विशाल हुलावळे, दत्ता केदारी आणि नवनाथ हरपुडे उपस्थित होते.

PMC : पुणे महापालिकेत मोठा फेरबदल : उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच ( Lonavala Municipal Council elections) सुरू झाली असताना दुसऱ्याच दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी आणि मूळ शिवसेना आहे, त्यामुळे राज्यभरातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आता शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यांनी सांगितले की शिवसेना लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक ताकदीने लढवणार असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल.

Today’s Horoscope, Wednesday : आजचे राशीभविष्य – बुधवार, १२ नोव्हेंबर २०२५

बारणे यांनी पुढे सांगितले की तळेगाव दाभाडे शहरात भाजप ( Lonavala Municipal Council elections) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, तर वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपसोबत आघाडीतून लढवली जाईल. या निवडणुकीत पक्षनिष्ठ आणि मेहनती कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घडामोडींमुळे लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटातील महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने निवडणुकीपूर्वीचा राजकीय तोल बदलू शकतो. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त ( Lonavala Municipal Council elections) केली जात आहे.

Follow Us On

Also Read