मावळ ऑनलाईन – मंगळवारी (दि ११) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ( Kamshet Accident News) कामशेत येथे कंटेनरने उडवले एका महिला वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर, दोन चार किरकोळ जखमी झाले. ही भीषण घटना मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात घडली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून, संतप्त नागरिकांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन सुरू केले आहे.
PCMC News Reservation Release : प्रत्येक प्रभागात दोन महिला राखीव जागा राहणार
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामशेत येथे भैरवनाथ मंदिरामध्ये दासई-उरण येथील संत धावजी पाटील पायीवारी दिंडी रात्री मुक्कामाला होती. सकाळच्या सुमारास आळंदीकडे दिंडीने प्रस्थान केले असता रस्ता ओलांडताना पुणे मुंबई महामार्गावरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने वारकऱ्यांना उडवले त्यामध्ये पाच वारकरी गंभीर जखमी असून तीन-चार किरकोळ जखमी आहेत. तर महिला वारकऱी प्रियंका प्रभाकर तांडेल ( वय 52) यांचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झाला आहे.जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले ( Kamshet Accident News) आहे.
अपघातानंतर रस्त्यावर मृतदेह पडलेला असल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाविरोधात घोषणाबाजी करत महामार्ग अडवला. घटनास्थळी कामशेत पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, कंटेनर चालक फरार झाल्याचे प्राथमिक वृत्त ( Kamshet Accident News) आहे.




















