आमदार सुनील शेळके यांना अखेर बाळा भेगडे यांनी दिली टाळी
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली आहे. दीर्घकाळ एकमेकांविरुद्ध राजकारण करणारे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी अखेर एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची महायुती (Talegaon Mahayuti) जाहीर केली. सोमवारी (दि. १०) तळेगावात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
तळेगाव शहराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही महायुती (Talegaon Mahayuti) करण्यात आल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. महायुती अंतर्गत नगराध्यक्षपदाची अदलाबदल पद्धत ठेवण्यात आली असून, पहिल्या अडीच वर्षांसाठी भाजपचे संतोष दाभाडे पाटील नगराध्यक्षपदी असतील, तर उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काकडे यांना संधी मिळणार आहे.

Maval News : मावळात महिनाभरात 50 घोणस सापांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता
या निर्णयामुळे तळेगाव नगर परिषदेसह संपूर्ण मावळ तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे. तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी चौदा प्रभागांमधील अठ्ठावीस उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे मुंबईत मंगळवारी बैठक घेऊन अंतिम उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब करणार आहेत.
Remove the Wrong Divider : ‘मोरवाडी चौकातील चुकीचे डिव्हायडर हटवा, भ्रष्टाचार बंद करा’
लोणावळा नगर परिषद आणि वडगाव नगर पंचायतीसाठीसुद्धा या महायुतीच्या (Talegaon Mahayuti) माध्यमातून निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढील रणनीती ठरविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ चौधरी, कृष्णा कारके, महिला शहराध्यक्ष शैलजा काळोखे, सत्यशीलराजे दाभाडे, विठ्ठल शिंदे तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते इंदरमल ओसवाल आणि चिराग खांडगे यांच्यासह नगराध्यक्षपदासाठी एकमत झालेले संतोष दाभाडे पाटील आणि गणेश मोहनराव काकडे (Talegaon Mahayuti) उपस्थित होते.
या महायुतीमुळे मावळ तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळणार असून निवडणुका विकासाभिमुख आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील, असा विश्वास स्थानिक राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.






















