आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या उमेदवारांना व राजकीय पक्षांना सूचना
मावळ ऑनलाईन न्यूज : नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी उमदेवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून (ता. १०) सुरू होत आहे. (Nominations From Monday) त्यामुळे, सर्व उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदार होणार आहे. नगर परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावर उमेदवारांना आवश्यक परवानग्या घेण्यासाठी ‘एक खिडकी’ सुविधा निर्माण करण्यात आली आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे. (Nominations From Monday) तसेच निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोणत्याही प्रकारचा नियमभंग सहन केला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
आदर्श आचार संहितेमध्ये काय करावे व काय करू नये याबाबतची माहितीही सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज दाखल करताना उमेदवारासह केवळ दोन जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
उमेदवारांनी सार्वजनिक सभा, प्रचार फेरी, (Nominations From Monday) सोशल मीडिया वापर यांसाठी आवश्यक परवानगी घ्यावी, प्रचाराची सर्वांना समान संधी मिळावी यासाठी सभांसाठी जागेची मागणी करताना करताना ४८ तास अगोदर परवानगीसाठी अर्ज दाखल करावे तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक निर्णय अधिकारी अमिता तळेकर, मुख्याधिकारी अशोक साबळे, पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांच्या, (Nominations From Monday) उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत त्यांना निवडणूक काळात आदर्श आचार संहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



















