मावळ ऑनलाईन न्यूज : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. ८) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास पुण्याकडे सामान्य एका ट्रकला अचानक आग लागली. (Truck Catches Fire) ट्रकच्या टपावर ठेवलेल्या कापडाने पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक सर्व्हिस लेनवर थांबवला, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
महामार्ग पोलिसांची देवदूत यंत्रणा आणि अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग अवघ्या यहा मिनिटांत आटोक्यात आणली. (Truck Catches Fire) या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान टळले आहे व सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, आग विझविण्यासाठी पुण्याकडे जाणारी लेन काही काळ बंद करण्यात आली होती. यामुळे थोडावेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.



















