मावळ ऑनलाईन न्यूज : कुसगाव खुर्द मावळ येथे भात कापणी चालू असताना शेतामध्ये १२ फुटी आजगर आढळला आहे. (Huge Python Spotted) योगेश शांताराम लालगुडे हे शेतामध्ये भात कापणीचे काम करत होते. तेव्हा अचानक त्यांना वेटोळे घालून बसलेला अजगर दिसला.
लालगुडे यांनी ताबडतोब वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्याशी संपर्क साधला. आंद्रे यांनी त्याठिकणी ताबडतोब जाऊन पहाणी केले असता ‘इंडियन रॉक पायथन’ जातीचा १२ फूट लांबीचा अजगर आढळला. (Huge Python Spotted) अजगराला ताबडतोब पकडून त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले आहे, अशी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिली



















