मावळ ऑनलाईन – वराळे (मावळ) येथील डॉ डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस ( D Y Patil Technical Campus) आणि डॉ डी वाय पाटील एज्युकेशनल फेडरेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड अनुजा पाटील यांच्या संकल्पनेतून महाविद्यालायील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी नुकताच मलेशिया -क्वालालंपुर येथे अभ्यास दौरा केला.
10 th And 12 th Exam 2025 : इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; उत्तीर्णतेसाठी लागणाऱ्या किमान गुणांची अट सुलभ केल्याने हजारो विद्यार्थ्यांना दिलासा
आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शिक्षण आणि संशोधन पद्धती अनुभवण्यासाठी ( D Y Patil Technical Campus) या शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मलेशिया येथील नामांकित शैक्षणिक संस्था , मॅनेजमेंट अँड सायन्स युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी पुत्र मलेशिया या विद्यापीठांना भेटी दिल्या हा दौरा विद्यार्थ्यांच्या जागतिक दृष्टिकोनाची व्याप्ती वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
Dr. Alaknanda Matade : डॉ अलकनंदा माताडे यांचा शोध निबंध साता समुद्रा पार
या भेटी दरम्यान तेथील आधुनिक शैक्षणिक सुविधा,अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रांची पाहणी विद्यार्थ्यांनी केली.तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रमांची माहिती घेत तेथील विद्यापीठाचे व्यवस्थापन, शिक्षण पद्धत व जागतिक शिक्षण प्रणालीचा जवळून अभ्यास केला. विद्यापीठाच्या विविध आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांची माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींची कल्पना आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाच्या संशोधन विद्यापीठाच्या कार्याची माहिती ( D Y Patil Technical Campus) घेतली.
या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वातावरण, प्रगत संशोधन पद्धती आणि जागतिक उद्योग क्षेत्रातील अपेक्षा यांची माहिती करून देणे हा होता. या शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून, त्यांना दनवीन तंत्रज्ञान, सांस्कृतिक विविधता आणि जागतिक स्तरावरच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या पद्धती शिकायला मिळाल्या.भविष्यात भारत आणि मलेशिया यांच्यातील शैक्षणिक सहकार्यासाठी हा अभ्यास दौरा नवीन संधी निर्माण करेल .
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान,सांस्कृतिक आदानप्रदान आणि जागतिक पातळीवरच्या शिक्षण पद्धती यांची माहिती मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील अभ्यासाला आणि करिअरला एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास महाविद्यालाचे प्राचार्य डॉ सुरेश शिरबहादुरकर यांनी व्यक्त केला. हा दौरा आमच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक सहल नव्हती, तर जागतिक ज्ञानाचे द्वार उघडणारी एक प्रेरणादायक संधी होती. मलेशियातील या उच्च विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मानक पाहून विद्यार्थ्यांच्या करिअरच्या कल्पनांना नवी दिशा मिळाली ( D Y Patil Technical Campus) आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ सुशांत पाटील यांनी व्यक्त केले.
हा अभ्यास दौरा महाविद्यालयातील शिक्षक डॉ. योगेश गुरव, प्रा.अल्पना अडसूळ,प्रा भावना शिंदे, प्रा.प्रशांत काठोळे आणि विद्यार्थी यांनी केला.



















