मावळ ऑनलाईन – ॲड. पु.वा. परांजपे विद्यामंदिरात वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन आणि विद्यार्थी दिवस उत्साहात( Paranjape Vidya Mandir) साजरा करण्यात आला. या निमित्ताने सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण कांबळे, दत्ता बनसोडे, सुनंदा जाधव, काजल किरवले, स्वाती टेमकर, हुडगिरी, विशाल ओव्हाळ, प्रवीण गायकवाड, चेतन धोंडी, जितेंद्र पाटील, सोनाली शिंदे, शिक्षक प्रतिनिधी संपत गोडे, सौ आशा आवटे, ज्येष्ठ शिक्षक राम कदमबांडे, सौ रजनी बधाले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते भारत माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. पोटे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या ( Paranjape Vidya Mandir) विकासाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, आधुनिकतेची कास धरत विद्यालयाने डिजिटल स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून स्पोकन इंग्लिशसारखे उपक्रम राबवले आहेत. तर योग, ध्यानधारणा आणि मेडिटेशन यांचा शालेय दिनक्रमात समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, एकाग्रता आणि शरीरसंवर्धनाचे गुण रुजवले जात आहेत. विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. बाबासाहेबांचे आजीवन विद्यार्थी म्हणून जगणे ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे म्हणाले की, शाळा या देशाचे भविष्य घडविणारी मंदिरे आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नीतिमत्ता, संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे भान रुजवले जाते. शाळेतील पोषक वातावरणामुळे भविष्याचे निरोगी आधारस्तंभ तयार होतात, असे त्यांनी ( Paranjape Vidya Mandir) सांगितले.
कार्यक्रमात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, परांजपे विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले.
शाळेच्या भौतिक सुविधांमधील संपन्नता, बौद्धिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील यश, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण, विद्यार्थ्यांची वाढणारी संख्या अशा अनेक वैशिष्ट्यांचा उल्लेख सुवर्णा काळडोके यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम ( Paranjape Vidya Mandir) घेतले.




















