मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या काकड आरती सोहळ्याची बुधवारी (दि ५) मोठ्या उत्साहात सांगता झाली. हा सोहळा कोजागिरी पौर्णिमेपासून सुरु होता. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा एक महिना हा सोहळा पार पडला.
Exerbia Society : आंबीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
श्री दत्त मंदिरामध्ये दररोज पहाटे देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त गणेश ढोरे, चंद्रकांत ढोरे, ॲड अशोक ढमाले,ॲड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, भास्करराव म्हाळसकर, सुनीता कुडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या काकड आरती सोहळ्यात विविध मानकऱ्यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात दररोज पहाटे पोटोबा महाराजांचा अभिषेक, श्री विठ्ठल रुख्मिणी महापूजा व मंगल चरणाने सुरुवात करून भूपाळ्या, भजनमालिका, वासुदेव, जोगी, आंधळे, पांगळे, मुका, बहिरा,गौळणी, अभंग, आरती व पसायदानाने सांगता असा दिनक्रम होता.
हभप सागरमहाराज पडवळ यांच्या काल्याच्या कीर्तन सेवेने व पालखी प्रदक्षिणेने या काकड आरती सोहळ्याने उत्साहात सांगता झाली. या वेळी शहरातील नागरिक, महिला यांचा सहभाग लक्षणीय होता. उद्योजक अतुल वायकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. विणेकरी पंढरीनाथ भिलारे, बबनराव भिलारे, विठ्ठलराव ढोरे, मृदंगमणी संतोष ढोरे, साई पानसरे,संतोष ढोरे, गायनाचार्य शिवाजी शिंदे, महेंद्र ढोरे, विकी म्हाळसकर, अंकुश लोहार, हभप देवराम कुडे, बाळासाहेब कुडे, किसनराव भेगडे, शंकरराव भिलारे, ज्ञानेश्वर म्हाळसकर, नारायण ढोरे, नरेंद्र ढोरे, किशोर गायकवाड, पुजारी अशोक गुरव आदींनी नियोजन केले.



















