मावळ ऑनलाईन – तळेगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात ( Talegaon Dabhade News )आयोजित काकड आरती महोत्सवाची सांगता धार्मिक कार्यक्रम व हभप गणेशमहाराज जांभळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या वेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
Lohagad Shiv Smarak : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव
श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्यावतीने यावर्षीही मंदिरामध्ये महिनाभर काकड आरती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने दररोज पहाटे काकड आरती, भजन, प्रवचन असे कार्यक्रम होत होते.
कार्यक्रमाची सांगता हभप गणेशमहाराज जांभळे यांच्या काल्याचे कीर्तनाने झाली. मंदिरामध्ये पहाटे अभिषेक व महापूजा उद्योजक संग्राम कृष्णराव जगताप व परिवाराच्यावतीने करण्यात आली. जगताप परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात ( Talegaon Dabhade News )आले.
Parth Pawar Land Case : 99% मालकी पवारांची, तरीही गुन्हा फक्त भागीदारांवर
कार्यक्रमाचे नियोजन विश्वस्त बाळकृष्ण आरडे महाराज, यतीन शहा, नथुराम महाराज जगताप पाटील, मुरलीधर ढेकणे, प्रदीप कडूसकर, दिनेश दरेकर, हरिदास वनारसे, विलास गायकवाड, नाना धामणकर, अतुल देशपांडे, सीमा शेलार, सीमा कुलकर्णी तसेच निशा शेळके यांच्यासह सर्व पदाधिकारी व भाविकांनी केले ( Talegaon Dabhade News ) होते.



















