मावळ ऑनलाईन – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी ( Lohagad Shiv Smarak ) व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पौर्णमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Today’s Horoscope, Friday : आजचे राशीभविष्य : शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५
शिवस्मारकावर हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिवरायांच्या जयघोषाने नवचैतन्य निर्माण झाले होते. शिवस्मारकावर सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. शिवस्मारक परिसरात भव्य शिवसृष्टी साकारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा मनोदय सर्वांनी व्यक्त केला.
MLA Mahesh Landge : मावळच्या आखाड्यात भोसरीच्या पैलवानाची एन्ट्री
या कार्यक्रमासाठी गणेशभाऊ धानिवले, सोनालीताई बैकर, राजू शेळके, रमेश बैकर,( Lohagad Shiv Smarak ) शंकर चिव्हे, महेंद्र बैकर, पोपट दिघे, सोमनाथ बैकर, अभिषेक बेकर, पंढरीनाथ विखार , बाळू ढाकोळ, काजल ढाकोळ, स्वाती मरगळे, स्नेहल बेकर, ज्योती धानिवले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, अनिकेत अंबेकर, सचिन निंबाळकर, अमोल गोरे, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, संदीप भालेकर, राहुल वाघमारे, मंगेश रावणे, महेश शेळके, तात्यासाहेब भराटे, सचिन आमले, निलेश भोसले, करण निकाजू, तानाजी सागावे आदी कार्यकर्त्यांनी केले होते.
लोहगड विसापूर विकास मंच चालू वर्षात रोप्य महोत्सवी वर्षात पदार्पण ( Lohagad Shiv Smarak ) करत आहे. गेल्या पंचवीस वर्षात मंचाने लोहगड विसापूर किल्ल्यावर दुर्ग संवर्धनाचे आदर्श काम उभे केले. किल्ल्यावरील शिवमंदिर सर्वप्रथम मंचांनी बांधले. त्यानंतर पुरातत्व विभागाचा पाठपुरावा करून सर्वप्रथम लोहगडला भक्कम असा गणेश दरवाजा बसविला. मुख्य द्वाराला भक्कम सागवानी दरवाजा बसविल्यामुळे महाराष्ट्रातील पहिला किल्ला म्हणून हा मान लोहगडाला जातो.
पुढे मंचाच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले ( Lohagad Shiv Smarak ) आणि शिवकालीन प्रथेनुसार गडाचे दरवाजे दररोज संध्याकाळी बंद झाल्यामुळे गडावरील अनुचित प्रकारांना आळा बसला. मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले.
मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली. मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नांमुळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडला नामांकन मिळाले असल्यामुळे सर्व शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
२०२५ हे वर्ष मंचाचे रौप्य महोत्सवी वर्ष ( Lohagad Shiv Smarak ) असल्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती यावेळी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली.



















