यूके, इंग्लंड मधील नामांकित विद्यापीठांचा सहभाग
मावळ ऑनलाईन – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) ( PCU)साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे भारत आणि युनायटेड किंगडम, इंग्लंड शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अल्युमनी युनियन, यूके (एनआयएसएयू) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ हा विशेष कार्यक्रम गुरुवारी (दि.६ नोव्हेंबर) सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जगातील नामांकित विद्यापीठे, शिक्षणतज्ज्ञ आणि यूके मधील भारतीय माजी विद्यार्थी पीसीयू च्या विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शैक्षणिक व्यावसायिकांना यूके, इंग्लंड मध्ये शिक्षण ( PCU) घेण्यासाठी आवश्यक अशी माहिती, मार्गदर्शन आणि अनुभव उपलब्ध ऐकायला मिळतील. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, कॅम्पस जीवन, विद्यार्थ्यांचे अनुभव, आर्थिक नियोजन, निवास व्यवस्था आणि इंग्रजी भाषेची आवश्यकता या सर्व विषयांवर यूके, इंग्लंड मधील विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि भारतीय माजी विद्यार्थी माहिती देणार आहेत.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. येथे विद्यार्थी केंद्र बिंदू मानून विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता व उद्यमशीलता वाढवण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध चर्चासत्रे, मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. तसेच विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात जाऊन पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी व ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ चे समन्वयक व आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर यांनी केले ( PCU)आहे.
Karmaveer Bhaurao Patil Award : सरस्वती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित
‘अचिव्हर्स डायलॉग्स’ हा एनआयएसएयू आणि ब्रिटिश कौन्सिल इंडियाच्या सहकार्याने राबविण्यात येणारा बहु उपयोगी महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, जो यूके विद्यापीठांतून शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा गौरव करतो, तसेच भारत व यूके शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देतो. या उपक्रमा द्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, संस्थात्मक भागीदारी निर्माण व्हावी आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण संधींना चालना मिळावी हा हेतू आहे. कार्यशाळा, प्रदर्शन आणि चर्चासत्र द्वारे रोजगार क्षमता, जागतिक शैक्षणिक मानके आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणातील संधींवर विशेष ( PCU) भर दिला जातो.
यूके, इंग्लंड मधील इम्पीरियल कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL), किंग्स कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टन, युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो, युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन, स्वान्सी युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड, युनिव्हर्सिटी ऑफ लीसेस्टर, युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफर्डशायर, युनिव्हर्सिटी ऑफ एसेक्स, ब्रुनेल युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वूल्व्हरहॅम्प्टन आदी प्रतिष्ठित विद्यापीठांचे प्रतिनिधी कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, पीसीयू व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ( PCU) आहे.





















