मावळ ऑनलाईन – तळेगाव शहराचे ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात बुधवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यांच्यावतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ हजार दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत.
त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त तळेगाव दाभाडे ऐतिहासिक नगरीतील जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज दीपोत्सव बुधवार (दि ५) सायंकाळी ०६.३० वाजता ५ हजार दिवे प्रज्वलित करून साजरा करण्यात येणार आहे.
Alfia Shikilkar : अल्फीया शिकीलकर सीएची परीक्षा उत्तीर्ण ; दीपक भेगडे यांच्याकडून अभिनंदन
यावेळी संगीतरत्न पुरस्कार प्राप्त जोडी सुप्रसिद्ध गायक विशाल रसाळ व सौ सोनल रसाळ यांचा भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
मंदिरात नामांकित कलाकारांकडून भव्य दिव्य फुलांची आरास तसेच तळेगावातील ऐतिहासिक धार्मिक स्थळांची प्रतिकृती रांगोळीच्या स्वरूपात एकाच ठिकाणी पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे आवाहन देखील संयोजकांकडून करण्यात आले आहे.
सर्व महिलांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.सर्व उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे.



















