मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगरपरिषद माजी नगरसेवक अयुबभाई ( Alfia Shikilkar ) शिकीलकर यांची पुतणी आणि अन्वरभाई शिकीलकर यांची कन्या कु. अल्फीया अन्वर शिकीलकर हिने सीएची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून चार्टड अकाऊंटट होण्याचा मान मिळवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रभाग क्र.13 चे इच्छुक उमेदवार दीपक भेगडे यांनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी तिला ( Alfia Shikilkar ) शुभेच्छा दिल्या.
Santosh Bhegde : माजी नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने तुळजापूर, अक्कलकोट दर्शन यात्रा
या प्रसंगी शिकीलकर जमातचे अध्यक्ष अजीजभाई शिकीलकर, अन्वरभाई शिकीलकर, उद्योजक संदीप भेगडे, गणेश आप्पा भेगडे, रामभाऊ भेगडे, गणेश सातकर, नीरज भेगडे, रियाजभाई शिकीलकर, सोहेल शिकीलकर, साजिदभाई शेख, प्रेमनाथ परदेशी आदी मान्यवर उपस्थित ( Alfia Shikilkar ) होते.



















