मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्यावतीने ( Shree Vitthal Mandir) कार्तिकी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती भजन तसेच हरिपाठ प्रवचन आणि कीर्तन असे कार्यक्रम दिवसभरात आयोजित करण्यात आले ( Shree Vitthal Mandir) होते.
Chandrika Pujari : चंद्रिकाच्या कामगिरीमुळे झोपडपट्टीतील मुलांना नवी प्रेरणा- राहुल डंबाळे
.
पहाटेची अभिषेक महापूजा कु सिद्धी पराग गायकवाड व नित्योपचार समितीचे सचिव विलास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पांडुरंगाच्या दर्शनासाठी झाली होती.
सायंकाळी ह भ प नथुराम महाराज जगताप पाटील यांचे प्रवचन सेवा व रात्री ह भ प मनोहर महाराज आळंदीकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली त्यानंतर जागर व महाआरती ( Shree Vitthal Mandir) करण्यात आली.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल मंदिर संस्थांचे विश्वस्त ह भ प बाळकृष्ण आरडे महाराज, यतीन शहा, प्रभाकर सरोदे, निवृत्ती महाराज फाकटकर, दिनेश दरेकर, शिवाजी सुतार, पुरोहित अतुल काका देशपांडे यांनी केले होते. यावेळी महाआरती व प्रसादाचे वाटप गायकवाड परिवाराच्या वतीने ( Shree Vitthal Mandir) करण्यात आले.






















