मावळ ऑनलाईन – चाकणजवळील नाणेकरवाडी (ता. खेड) मंगळवारी (ता. २८) सकाळी चालकाच्या जागेवर बसलेल्या स्थितीतील ( Murder) रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्यानंतर मृत तरुणाचा कारमध्येच गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
विकास लक्ष्मण नाणेकर (वय ४४, रा. सुदाम्याचे पोहे अपार्टमेंटशेजारी, नाणेकरवाडी चाकण, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री ही घटना घडली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नाणेकरवाडीचे पोलिस पाटील राजू शांताराम नाणेकर ( Murder) यांनी याबाबत चाकण पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बबुशा ऊर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर (वय ४५, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) व योगेश सौदागर जाधव (वय २९, रा. बबुशा नाणेकर यांची खोली, नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
नाणेकर यांच्या फिर्यादीनुसार, नाणेकरवाडी ते एमआयडीसी रस्त्यावर( Murder) हुंदाई कंपनीच्या कारमध्ये (एमएच १४ एमक्यू ४७८३) विकास नाणेकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला. चाकण पोलिसांत याबाबत सुरुवातीला अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. विकास नाणेकर यांचा खून करून पळालेले आरोपी मावळातील नानोली भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नानोली तर्फे चाकण (ता. मावळ) येथे पोलिसांनी शुभम बाळासाहेब भोसले यांच्या घराच्या समोरून बबुशा नाणेकर व योगेश जाधव या दोघांना ताब्यात घेतले.
Rashi Bhavishya 29 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या दोघांना पोलिसांनी मावळ तालुक्यातून ताब्यात घेऊन युनिट ३ पथकाच्या कार्यालयात आणले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. विकास नाणेकर आणि बबुशा नाणेकर यांच्यात जमिनीचा वाद होता. सोमवारी (ता. २७) दोघांमध्ये यावरूनच वाद झाले. याच रागातून बबुशा नाणेकर व त्याचा साथीदार योगेश जाधव यांनी संगनमताने चाकूच्या साह्याने विकास नाणेकर याची गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखा युनिट ३ यांच्याकडून सांगण्यात आले( Murder) आहे.
चाकण पोलिसांकडून पंचनामा व घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी गेले. तेथे पंचनामा केला तसेच श्वानाद्वारे तपासणीही केली.
विकास नाणेकर याच्या पाठीमागे वडील, भाऊ, पत्नी, आई, मुले असा परिवार आहे. विकास हा पोलिस मित्र तसेच पोलिसांना माहिती देणारा म्हणून वावरत होता. पोलिसांनी नाणेकरवाडी येथील एका दारूधंद्यावर काल कारवाई केली. त्यावेळेस तो पोलिसांबरोबर तेथे होता. त्यामुळे त्याचा खूनामागे आणखीही कारणे आहेत का याचाही तपास केला जात ( Murder) आहे.




















