मावळ ऑनलाईन –सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026) हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.
काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!
ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो. ( Annual Horoscope 2026)
राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;
तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.
आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026)

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104.
मकर रास -कर्म फळाची प्राप्ती, शिखरावर पोहोचण्याची वेळ ( Annual Horoscope 2026)
मकर रास ही राशीचक्रातील दहावी रास असून,स्थिर व अर्थतत्त्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी शनी
आहे. मकर राशी बहुप्रसवी असून, शनीचे मुख्य गुण म्हणजे जबाबदारी व कर्तव्याची जाणीव, चिकाटीने व अखंडपणे काम करणे. शनी न्यायप्रिय असून कायद्याचे पालन करतो; त्यामुळे या राशीतील व्यक्ती सतत जागरूक असतात.
मकर राशीच्या व्यक्ती अत्यंत काटकसरी, हिशेबी व व्यवहारक्षम असतात; त्यामुळे संसारी जीवनात अग्रेसर राहतात. न्याय-अन्याय याबाबतीत तडजोड न करणे, शिस्त, सहनशीलता, विवेक व आचार हे गुण या व्यक्तींकडे भरपूर असतात. आत्मसंयम व स्वयंशासन जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक असते, आणि मकर राशीच्या व्यक्ती या गुणांमध्ये पारंगत असतात.
विचारपूर्वक प्रत्येक विषयाचा साधक व बाधक विचार करून कार्यभाग साधला जातो. प्रामाणिकपणा,
न्यायपणा आणि कोणत्याही कार्याची किंवा संस्थेची जबाबदारी उचलण्याची मानसिक तयारी या राशीच्या
व्यक्तींकडे असते. ध्यान, चितन, मनन व प्रथवैकल्यासाठी कोणतेही कष्ट करण्याची तयारी, चिकाटी व बृत्ती यामध्ये आढळते.
मकर राशीच्या व्यक्तींना मोठ्या संस्थांमध्ये गोपनीयता पाळण्याची मानसिकता असते. भावनेबरोबर वाहून जाणे, काल्पनिक जगात बावरणे किंवा भूतकाळात स्वप्नात रमणे हे त्यांच्या स्वभावात बसत नाही. त्यामुळे व्यवहारिक, संसारी व आर्थिक क्षेत्रात मकर राशीचे व्यक्ती यशस्वी ठरतात.
नक्षत्रांनुसार स्वभाव :- ( Annual Horoscope 2026)
मकर राशीमध्ये उत्तरा शाळा, श्रवण व धनिष्ठा ही नक्षत्रे येतात.
उत्तरा शाळा नक्षत्रातील व्यक्ती: तेजस्वी, अभिमानी, सर्वप्रिय, कार्यसफल, चांगल्या कार्यात पुढे होऊन काम करणारी, पशूंची आवड असलेली; शरीर स्थूल व मजबूत असते.
श्रवण नक्षत्रातील व्यक्ती: सदाचार संपन्न, ईश्वरभक्त, विद्वान, कर्तृत्ववान, कांतीमान; विद्याशास्त्र व धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करणारी; लोकप्रसिद्धी मिळते.
धनिष्ठा नक्षत्रातील व्यक्ती: निर्लज्ज, धनाढ्य, पराक्रमी, गर्विष्ठ, गायनप्रिय, साहसी, धर्मावर प्रेम करणारी.
चालू वर्षाचे भविष्य
राशीच्या स्पष्ट व सप्तम स्थानातून गुरुचे भ्रमण, तृतीय स्थानातून शनी व नेपच्यूनचे भ्रमण, राहू-केतूचे भ्रमण धन व अष्टम स्थानातून, हर्षल व प्लूटोचे भ्रमण पंचम व लग्नातून प्रथम स्थानात असे ही प्रमुख ग्रहस्थिती आहे.
गुरुच्या सहाव्या स्थानाच्या भ्रमणामुळे शत्रूवर विजय मिळेल. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
शरीरात स्थूलता वाढू शकते. नोकरीसाठी व सरकारी पदासाठी यश मिळेल. डिसेंबर-जानेवारी या कालखंडात कामामध्ये ताण-तणाव जाणवेल. काका-चुलते यांच्याकडून अपेक्षित कामे करून घेण्याची शक्यता आहे. ( Annual Horoscope 2026)
कोर्टकचेरी, परदेशी दौरे यासारख्या गोष्टींमध्ये यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने तळवे, ओटीपोट, हाताचे तळवे यासारख्या भागांची दक्षता घेणे आवश्यक आहे. उत्तरार्धात गुरुचे भ्रमण अनुकूल राहिल्यामुळे विवाह
इच्छुकांची विवाह पार पडतील. जोडीदारासोबत असलेले वादविवाद दूर होतील. व्यवसायामध्ये नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा कालखंड उत्तम राहील. कुटुंबाबरोबर पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांना भेटीगाठी देता येतील काही व्यक्तींना विदेश प्रवास घडू शकतो. स्वभावामध्ये धैर्य वाढेल.
लेखन, संवाद किंवा सामाजिक माध्यमांमध्ये चांगली प्रगती होऊ शकते.
कुटुंबामध्ये अचानक खर्च, आर्थिक ओढाताण, पूर्वी गुंतवणूक केलेल्या ठेवीसाठी खर्च करावा लागू शकतो.
विमा, प्रॉपर्टी यासंबंधी दस्तावेज किंवा कागदपत्रे हाताळताना जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
जुन्या पद्धतीच्या संकल्पना सोडून नवीन विचार स्वीकारावे. विद्यार्थी वर्गाला अनपेक्षित यश मिळेल. कलात्मक क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळाल्यामुळे जीवनाची दिशा बदलू शकते. प्रेम व प्रेमिकांसाठी हे वर्ष अनुकूल राहील.
ज्या व्यक्तींना विवाहात अडचणी होत्या, त्यांना अपेक्षित यश मिळेल. एकंदरीत, मकर राशीसाठी हे वर्ष अपेक्षित विवाह, जोडीदार. भागीदारीतील व्यवसाय व कलात्मक गुणांना वाव मिळवण्यासाठी उत्तम राहील.
उपासना व उपाय ( Annual Horoscope 2025)
*विष्णू व हनुमान उपासना केल्यास वर्ष उत्तम राहील.
*गणेश पूजन करावे. लोकरीचे ब्लॅकेट मंदिरात अथवा गरजू व्यक्तींना दान करावे.
*केशराचा गंध कपाळावर लावावा.
*अन्नदान अथवा गरजू व्यक्तींना दान करावे.
*घरामध्ये सुंदरकांड किंवा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पठण वाचन करावे.
*वाडवडिलांच्या किंवा पूर्वजांच्या नावाने दानधर्म अथवा वस्त्रदान करावे.
शुभ घटक 🙁 Annual Horoscope 2026)
शुभ रंग: हलका ग्रे, पांढरा, आकाशी निळा
भाग्यरत्न: पाच, डायमंड; तसेच सिट्रीन क्रिस्टल
शुभ दिनांक: कोणत्याही महिन्याचे ७,१७, २६
भाग्यकारक वयोवर्षे: २५, ३४, ४३, ५२, ६९.