मावळ ऑनलाईन – रक्षा क्षेत्रातील कामगारांना दसरा सणासाठी देण्यात येणारा बोनस दीपावली(Defence Sector) आली तरी देण्यात नाही आले आहे.
रक्षा क्षेत्रातील कामगारांना बोनस न मिळाल्याने उत्सव साजरा करता न आले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कोणत्याही प्रकारची खरेदी करता आली नाही त्यामुळे कुटुंबातील सदस्य सुद्धा व कामगार या सुस्तावलेल्या कारभारामुळे नाराज झाले आहे.
दरवर्षी 40 दिवसाचा बोनस दसरा सणासाठी जाहीर करण्यात येतो पण मागील सरल दोन वर्षे झाली दसरा सण व दिवाळी होऊन जाते तरी पण बोनस जाहिर करण्यात येत नाही.
रक्षा क्षेत्रातील संरक्षण विभागाचे भारतीय सेना (लष्कर), भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल व आयुध कोर या भागातील हजारो संख्येने कार्यरत कामगारांना Productivity Linked Bonus बोनस दिला जातो.
दिवाळी सणात सुद्धा बोनस जाहिर करण्यात नाही आले…
आता सलग 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत अधिकतर सर्व कार्यालयाला सुट्टी असल्याने बोनस जाहिर होणार नाही.
आणि जाहिर झाले तरी कोणत्याही प्रकारचा फायदा कामगारांना होणार नाही.
दरवर्षी बोनस दसरा दुर्गा पूजा निमित्ताने हा बोनस दिला जातो पण आता दिवाळी होऊन जाते तरी बोनस जाहिर होत नाही सी ओ डी वर्कर्स युनियन देहूरोड व ऑल इंडिया डिफेंस एम्प्लॉईज फेडरेशनचे वतीने रक्षा सचिवांना सुचित करण्यात आले आहे.
अशी माहिती जनरल सेक्रेटरी श्री सी श्री कुमार व चंदन श्रीरंग आल्हाट वDefence Sector संजय जगदीश डुमडे यांनी सांगितले.