मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदोरी-वराळे जिल्हा परिषद (Maval)गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी व खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भेट घेतली.
या भेटीवेळी युवानेते पार्थ पवार आणि प्रशांतदादा भागवत हे देखील उपस्थित होते. ही उपस्थिती मावळच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल देणारी ठरली असून, राजकीय वर्तुळात चर्चेला वेगळंच वळण लागलं आहे.
Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस यंदा दिवाळी साजरी करणार नाही – शरद पवारांची घोषणा

मेघाताई भागवत या गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक विकासकामांमध्ये, महिलांच्या सक्षमीकरणात आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांच्या जनसंपर्क आणि लोकविश्वासामुळे त्या इंदोरी-वराळे गटातील सर्वाधिक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेली ही भेट केवळ औपचारिक न ठरता, विकास, महिलांसाठी उपक्रम आणि पक्ष संघटन बळकटीकरण या विषयांवरही चर्चेचे सूर लागल्याचे बोलले जात आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, या घडामोडींमुळे मावळ तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांचा उदय होत असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.