मावळ ऑनलाईन –एका तरुणाने बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ (Somatane Phata)बाळगले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (१४ ऑक्टोबर) रात्री श्री चौराई सिटी समोर, परंदवडी रोड, सोमाटणे फाटा येथे घडली.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल गणेश सावंत यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अजय गुलाब साळुंके (२३, नेरे दत्तवाडी, मुळशी) याला अटक करण्यात आली आहे.
Nutan Engineering College : नूतन कॉलेजमध्ये “एॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर परिसंवादाचे आयोजन
Uddhav Thackeray:मतदान कुणाला जातं हेच कळत नाही! -उद्धव ठाकरे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय साळुंके याच्याकडे ५२ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता. त्याने ती अवैधरित्या बाळगली असताना तो पोलिसांना मिळून आला. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.