मावळ ऑनलाईन – तळेगाव जनरल हॉस्पिटल यांच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या पुण्यतिथीचे अवचित्य साधून रोटरी क्लब ऑफ गोल्डन ( Rotary Club of Golden)तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप याचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Rashi Bhavishya 15 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तळेगाव जनरल हॉस्पिटल नेत्र रुग्णालय तळेगाव स्टेशन या ठिकाणी आयोजित केलेले आहे.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे, चेअरमन शैलेश शहा, डॉ हेमंत सरदेसाई, डिस्ट्रिक्ट 3131 च्या मेडिकल कमिटी मेंबर्स डॉ नेहा कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत.
वैद्यकीय सेवा डॉ कल्पिता राऊत व डॉ मेघा सोनवणे हे देणार आहेत.तळेगाव शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा ( Rotary Club of Golden) लाभ घ्यावा असे आवाहन गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी व प्रकल्प प्रमुख राकेश गरुड यांनी केले आहे.
संपर्क – 9823444993,8483042309