situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval Taluka Warkari Mandal : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक उत्साहात संपन्न

Published On:
Maval Taluka Warkari Mandal

मावळ ऑनलाईन –मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची ( Maval Taluka Warkari Sampradaya Mandal) मासिक बैठक रविवार (दि१२) रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, कामशेत येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीसाठी मंडळाचे अनेक पदाधिकारी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन व संपूर्ण नियोजन हे मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे कामशेत शहराध्यक्ष ह.भ.प. शंकर महाराज खेंगले यांनी केले होते.

Rashi Bhavishya 15 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

श्री विठ्ठलाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून या बैठकीला सुरूवात करण्यात आली. सर्वप्रथम मंडळाचे भजन संपन्न झाले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते ह.भ.प. माऊलीमामा शिंदे हे होते. यावेळी मंडळाच्या अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वांचे स्वागत मंडळाचे विश्वस्त ह.भ.प. बजरंग महाराज घारे यांनी केले. तर प्रास्ताविक सचिव ह.भ.प. रामदास गणपत पडवळ यांनी केले.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले ह.भ.प. माऊली शिंदे यांनी मंडळ राबवत असलेल्या अनेक सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. तसेच मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या.

MLA Sunil Shelke : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तीप्रदर्शन मेळावा ; आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा जोश, पक्षाच्या बळकटीकरणाला नवा वेग!

यानंतर मंडळाचे संस्थापक/अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे यांनी उपस्थित वारकरी बांधवांना विशेष मार्गदर्शन केले व मंडळाचे कार्य आणि भविष्यातील ( Maval Taluka Warkari Sampradaya Mandal) वाटचाल यांविषयी चर्चा केली.

त्याचप्रमाणे मंडळाचे कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोष कुंभार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर रूडसेट या संस्थेतर्फे मंडळातील तरूण युवकांना स्वंयरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मंडळाचे विभाग प्रमुख ह.भ.प. शिवाजीराव बोडके यांनी थोडक्यात माहिती दिली व ज्या तरूणांना या संस्थेतर्फे साहाय्य हवे आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

त्याचप्रमाणे दरवर्षी मंडळाच्या वतीने आळंदी कार्तिकी पायी वारी निमित्त कोकण विभागातून आळंदीला जाणाऱ्या दिंडींतील वारकऱ्यांचा जांभूळ फाटा येथे सन्मान केला जातो. तसेच मंडळाच्या वतीने या वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था केली जाते. हा कार्यक्रम दिनांक १३, १४ व १५ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे, या कार्यक्रमाचेही नियोजन या बैठकीत करण्यात आले. त्याचप्रमाणे मंडळ करत असलेल्या कार्याची दखल घेवून ह.भ.प. शिवाजी तरस, ह.भ.प. साहेबराव देशमुख, ह.भ.प. शिवाजी शिरसट या वारकऱ्यांनी मंडळामध्ये काम करण्याची इच्छा दर्शविल्याने त्यांना मंडळाचे सभासद म्हणून सहभागी करून घेण्यात आले. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात ( Maval Taluka Warkari Sampradaya Mandal) आला.

या संपूर्ण बैठकीचे आयोजन, संपूर्ण व्यवस्था व स्नेहभोजनाची व्यवस्था यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांनी ह.भ.प. शंकर महाराज खेंगले यांचे विशेष कौतुक केले. शेवटी पसायदानाने या बैठकीची सांगता करण्यात आली. या संपूर्ण बैठकीचे सूत्रसंचालन मंडळाचे संघटक ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांनी केले. सर्वांचे आभार मंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. दिलीप वावरे यांनी मानले.

या बैठकीसाठी मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन आडिवळे सर, बालवारकरी समितीचे अध्यक्ष काशिनाथ सातकर, आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक रावजी वारिंगे, गोविंद सावले, महादुबुवा वाटाणे, पंढरीनाथ वायकर, साईनाथ राऊत, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत सातकर, अभिमन्यू शिंदे, दशरथ काळे, सुर्यकांत दांगट, बंडू कदम, विजय गायखे, सोमनाथ महाराज सातपुते, संजय महाराज बांदल, भाऊसाहेब थरकुडे, बारकू खांदवे, सदाशिव पेटकर, दशरथ कदम यांसह अनेक वारकरी मोठ्या ( Maval Taluka Warkari Sampradaya Mandal) संख्येने उपस्थित होते.

Follow Us On