मावळ ऑनलाईन – भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक ( Accident) दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली. मात्र अल्पवयीन मुलांचे पालक तक्रार देण्यास तयार नसल्याने पोलिसांनी स्वतः फिर्याद देत कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास तळेगाव चाकण रोडवर आंबी वारंगवाडी येथे घडली.
Sanjay Raut : अस्वस्थ वाटू लागल्याने संजय राऊत रुग्णालयात
प्रथमेश बाळासाहेब मांडेकर (वय २१, रा. डी.वाय. पाटील कॉलेजजवळ, आंबी वारंगवाडी, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक अहमद कासीमसात्र मुल्ला (वय ३८) यांनी रविवारी (दि. १२) याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ( Accident) आहे.
Prashant Bhagwat : विकास, समाजकार्य आणि जनसंपर्क यांचा अद्भुत संगम म्हणजे प्रशांत दादा भागवत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या इको कार (एमएच १४ केजे ६७१४) ही भरधाव वेगात चालवून वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्यात समोरून जाणाऱ्या दुचाकीस्वार मीत मनोहर शिल्लक (वय १५, रा. मस्करनीस कॉलनी, तळेगाव दाभाडे) आणि सर्वेश प्रविण आगळे (वय १४, रा. स्वराजनगरी, तळेगाव दाभाडे) यांना धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी( Accident) झाले.
तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातात दोन्ही दुचाकीस्वार मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांनी फिर्याद देण्यास नकार दिला. मात्र त्यातील एका मुलाला रक्ताची उलटी झाल्याने अपघाताची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत ( Accident) आहेत.