मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक येथे(Adhale Budruk
) शेतीकाम करताना ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) सायंकाळी घडली. निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव बाळू सोपान चांदेकर (वय ४७, रा. आढलेखुर्द, ता. मावळ) असे असून, या प्रकरणी खंडू बारकू घोटकुले (वय ४६, रा. आढले बुद्रुक, ता. मावळ) यांनी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Abhang English Medium School: कृतियुक्त,आनंददायी गणिताचे शिक्षण देणारा उपक्रम शिक्षणप्रणालीसाठी आदर्श
Lonikand Crime News : लोणीकंद येथे युवकाकडून २२ लाखांहून अधिक किमतीचा अफू जप्त
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी खंडू घोटकुले यांच्या शेतात ज्वारी पेरणीचे काम सुरू होते. या कामासाठी बाळू चांदेकर हे ट्रॅक्टर चालवत होते. पेरणी पूर्ण झाल्यानंतर ते ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना वाहनाचा तोल जाऊन ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरचा भार अंगावर पडल्याने बाळू चांदेकर हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अपघाताचा पुढील तपास करत आहेत. पोलीस ट्रॅक्टरच्या तांत्रिक स्थितीचा आणि अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.शिरगाव परंदवडी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.