मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक येथे ( Maval Accident News )निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाच्या अंगावर पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना बुधवारी (८ ऑक्टोबर) सायंकाळी घडली.
NDA Student Suicide : खडकवासला एनडीएमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; परिसरात खळबळ
बाळू सोपान चांदेकर (४७, आढलेखुर्द, मावळ) असे मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. या प्रकरणी खंडू बारकू घोटकुले (४६, आढले बुद्रुक, मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद ( Maval Accident News ) दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या शेतात ज्वारी पेरणीचे काम सुरु होते. ट्रॅक्टर बाळू चांदेकर हे चालवत होते. ट्रॅक्टरच्या साहाय्याने काम केल्यानंतर ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. त्यामध्ये अडकून बाळू चांदेकर यांचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस तपास ( Maval Accident News ) करीत आहेत.