मावळ ऑनलाईन : पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर ( Pune Rural Police) फेरबदल करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बुधवारी (दि. 4 ऑक्टोबर) उशीरा रात्री या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या फेरबदलांमध्ये तब्बल 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 पोलीस निरीक्षक (पीआय) आणि ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) यांचा समावेश आहे.
यामध्ये मावळ तालुक्यातील वडगाव मावळ आणि कामशेत शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांच्या बदल्याही झाल्या आहेत. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षम पोलीस निरीक्षक कुमार रामचंद्र कदम यांची बदली सासवड येथे करण्यात आली आहे, तर कामशेत शहर पोलीस ठाण्याचे पीआय रवींद्र दत्तात्रय पाटील यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
वडगाव मावळ पोलीस ( Pune Rural Police) ठाण्याचे नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून अभिजित सुभाष देशमुख (सध्या परकीय नागरिक नोंदणी कक्षात कार्यरत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कामशेत शहर पोलीस ठाण्याचे नवीन पीआय म्हणून शंकर मोहन पाटील (सध्या उरळी कांचन येथे कार्यरत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे ग्रामीण पोलीस ( Pune Rural Police) दलात प्रशासनिक पातळीवर नवचैतन्य येणार असल्याचे वर्तवले जात आहे. जिल्ह्यातील विविध ठाण्यांमध्ये अनुभवी अधिकारी नेमण्यात आल्याने स्थानिक पातळीवरील गुन्हेगारी नियंत्रणात मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या बदल्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1. कुमार रामचंद्र कदम – वडगाव मावळ ते सासवड ( Pune Rural Police)
2. सचिन दत्तात्रय वांगडे – हवेली ते उरळी कांचन
3. रवींद्र दत्तात्रय पाटील – कामशेत ते नियंत्रण कक्ष
4. अभिजित सुभाष देशमुख – परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते वडगाव मावळ
5. वैशाली रावसाहेब पाटील – बारामती तालुका ते हवेली
6. शंकर मनोहर पाटील – उरळी कांचन ते कामशेत
7. चंद्रशेखर मोहनराव यादव – बारामती वाहतूक ते बारामती तालुका
8. श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी – नियंत्रण कक्ष ते बारामती वाहतूक
9. ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी – सासवड ते नियंत्रण कक्ष ( Pune Rural Police)
10. सपोनि महादेव चंद्रकांत शेलार – नारायणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा
11. सपोनि नितीन हनुमंत खामगळ – वेल्हा ते नियंत्रण कक्ष
12. सपोनि प्रवीण महादेव सपांगे – यवत ते नारायणगाव
13. किशोर विठ्ठल शेवते – वाचक अपोअ पुणे ते वेल्हा
14. सपोनि गजानन रतन चेके – वाचक उविपोअ बारामती ते नियोजित पोलीस ठाणे निरा-नृसिंहपूर
या फेरबदलांमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमध्ये नवीन कार्यशैलीचा अवलंब होण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या बदल्या महत्त्वाच्या ठरणार ( Pune Rural Police) आहेत.