मावळ ऑनलाईन – मावळ तालुका आंतरशालेय खो – खो स्पर्धेत ( Indrayani Junior College) तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षीय वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे या संघाची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. सिद्धार्थ पवार याची उत्कृष्ठ खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेने संघाचे अभिनंदन केले.
Vadgaon Maval News : इंदोरी प्राथमिक शाळेतील पाचशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
क्रीडा व युवक संचानलय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व सिध्दांत इंटरनॅशनल स्कूल सुदुंबरे मावळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मावळ तालुका आंतरशालेय खो – खो स्पर्धेत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाने १९ वर्षीय वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच १९ वर्षीय वयोगटातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील सिध्दार्थ पवार याची निवड करून सन्मानित करण्यात आले ( Indrayani Junior College) आहे.

Rashi Bhavishya 10 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी मुलांच्या संघाची निवड झाल्याबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे तसेच सर्व संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, उपप्राचार्य संदिप भोसले या सर्वांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी गोरख काकडे, क्रीडा शिक्षक योगेश घोडके यांचे मार्गदर्शन ( Indrayani Junior College) लाभले.