मावळ ऑनलाईन –पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ नगरपंचायतीची प्रभागनिहाय (Vadgaon Maval)आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली असून, यावेळी महिलांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. एकूण १७ प्रभागांपैकी तब्बल ८ प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत.
लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. हा कार्यक्रम नगरपंचायत कार्यालयात आज सकाळी ११ वाजता संपन्न झाला.
उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले. या वेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी, नागरिक आणि नगरपंचायतीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Krishnarao Bhegde Pharmacy : कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा
Pimpri Chinchwad: प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रियसीने भावाच्या मदतीने केला प्रियकराचा खून, 48 तासात आरोपी गजाआड
जाहीर झालेली आरक्षण यादी पुढीलप्रमाणे —
प्रभाग क्र. १ – अनुसूचित जमाती (ST) महिला
प्रभाग क्र. २ – ओबीसी सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४ – ओबीसी महिला
प्रभाग क्र. ५ – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ६ – ओबीसी सर्वसाधारण
प्रभाग क्र. ७ – अनुसूचित जाती (SC) सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८ – ओबीसी महिला
प्रभाग क्र. ९ – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. १० – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ११ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १२ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १३ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १४ – अनुसूचित जाती (SC) महिला
प्रभाग क्र. १५ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १६ – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. १७ – सर्वसाधारण महिला
महिला आरक्षणामुळे काही प्रभागांतील इच्छुक पुरुष उमेदवारांमध्ये निराशा दिसून आली, तर काही प्रभागांमध्ये नव्या चेहऱ्यांनी उत्साहाने तयारी सुरू केली आहे.
सोडत जाहीर होताच सोशल मीडियावर “भावी नगरसेवक” या नावाने पोस्टांचा पाऊस पडू लागला असून, स्थानिक राजकारणात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या (९ ऑक्टोबर) प्रारूप आरक्षण रचना प्रसिद्ध होणार आहे. ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.