मावळ ऑनलाईन – शाळकरी मुलांमध्ये भांडण ( Talegaon Crime News )झाले. या भांडणात दोघांनी एका मुलावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी (7 ऑक्टोबर) दुपारी बारा वाजताच्या सुमारास तळेगाव चाकण रोडवर घडली.
Rashi Bhavishya 8 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
प्रशांत भागवत वाघमारे (46, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक अल्पवयीन मुलगा आणि एका अल्पवयीन मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा नवीन समर्थ विद्यालय येथून पायी चालत घरी जात होता. तळेगाव चाकण रोडवर आरंभ हॉटेल समोर आल्यानंतर त्याच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि मुलीने त्याला रस्त्यात अडवले. त्याच्यावर धारदार शास्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत ( Talegaon Crime News ) आहेत.