मावळ ऑनलाईन – लोणावळा नगर परिषदेचे ( Lonavala Municipal Council) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या कार्यक्रमांतर्गत आज सकाळी लोणावळा नगरपरिषद येथे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर केली.
हा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता लोणावळा नगरपरिषद मुख्यालयात पार पडला यावेळी मावळ विभागाचे निवडणूक उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, लोणावळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अशोक साबळे सर्व पक्षाचे पदाधिकारी व नागरिक आधी उपस्थित होते.
Vadgaon Maval News : सुनिता महाजन ठरल्या महादुर्गा विजेत्या
यावेळी विद्यार्थ्यांनी चिट्ठ्यांद्वारे प्रभागातील आरक्षण निवडले. लोणावळा नगर परिषदेत 13 प्रभागातीलग व 27 जागासाठी ही निवडणूक होणार आहे. त्यातील चार प्रभागात अनुसूचित जाती एका प्रभागात थेट अनुसूचित जमाती व सात प्रभागात नागरिक मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या 27 जागांपैकी 13 जागांवर महिला उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र. 1 – न्यू तुंगार्ली (अ)- obc (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 2 – तुंगार्ली गावठाण (अ) – obc
(ब) – महिला
प्रभाग क्र. 3 – वळवण (अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
(ब) – महिला
प्रभाग क्र. 4 – रेल्वे विभाग (अ) अनुसूचित जाती (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 5 – नांगरगाव (अ) सर्वसाधारण
(ब) – महिला ( Lonavala Municipal Council)
प्रभाग क्र. 6 – भांगरवाडी 01 (अ) obc (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 7 – भांगरवाडी 02 (अ)- obc
(ब) – महिला
प्रभाग क्र. 8 – लोणावळा बाजार (अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
(ब) – महिला
प्रभाग क्र. 9 – लोणावळा गावठाण (अ) अनुसूचित जाती (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 10 – (अ) – गवळीवाडा obc (महिला)
(ब) – सर्वसाधारण ( Lonavala Municipal Council)
प्रभाग क्र. 11 – खंडाळा (अ) अनुसूचित जमाती (महिला थेट)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 12 – जुना खंडाळा (अ)- obc (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 13 – भुशी रामनगर (अ)- obc (थेट)
(ब) – महिला
(क) – महिला
निवडणूक कार्यक्रमांनुसार उद्या म्हणजे नऊ तारखेला प्रारूप आरक्षण रचना जाहीर करण्यात येणार असून 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागरिकांना या आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना देता येणार ( Lonavala Municipal Council) आहेत.