मावळ ऑनलाईन –महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या(Vadgaon Nagar Panchayat) आगामी निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी (दि ६) निश्चित करण्यात आले. यामध्ये वडगाव (मावळ) नगरपंचायतीस खुल्या प्रवर्गातील महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी राजकीय बैठका सुरू झाल्या आहेत.
२०१८ पूर्वी वडगाव ग्रामपंचायत होती. २०१८ मध्ये नगरपंचायत झाली. यामध्ये भाजप आठ, राष्ट्रवादी नऊ आणि मनसे एक अशा जागा निवडून आल्या होत्या. त्यामध्ये नऊ महिला आणि नऊ पुरुष होते.
MPSC Exam : एमपीएससीच्या विविध परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर
त्यावेळी जनतेमधून नगराध्यक्ष निवडण्यात आला असल्याने मयूर ढोरे हे प्रथम नगराध्यक्ष झाले. आता मात्र नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील महिला हे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आगामी नगराध्यक्ष कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले (Vadgaon Nagar Panchayat) आहे.