मावळ ऑनलाईन –तळेगाव-चाकण रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यासाठी तळेगाव दाभाडे येथे(Talegaon Dabhade) सर्वपक्षीय कार्यकर्ते रविवारी (५ ऑक्टोबर) उपोषणाला बसले. तसेच या आंदोलनाला सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दिला. प्रशासनाने तळेगाव ते माळवाडी दरम्यानच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरु केले. त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले.
तळेगाव स्टेशन विभागातील वडगाव फाट्यापासून माळवाडी पर्यंतच्या तळेगाव चाकण रस्त्यावरील खड्ड्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण होण्यासाठी तळेगाव दाभाडे परिसरातील सर्वसामान्य सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, उद्योजक रामदास काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, भाजपाचे मावळ तालुका प्रभारी रविंद्र भेगडे, सरदार वृषाली राजे दाभाडे यांच्या शिष्टाईला यश मिळाले असून काम सुरू झाल्यानंतरच उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सोडल्यामुळे तळेगाव परिसरामध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या बद्दल सहानुभूतीची भावना निर्माण झाली असून भविष्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नागरिकांचा प्रश्न सोडवण्याची ताकद तळेगाव शहरांमध्ये निर्माण झालेली आहे.
तळेगाव चाकण रस्त्यावरील खड्ड्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण व्हावे यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रविवार (दि ५) रोजी सकाळी दहा वाजता शांततेच्या मार्गाने आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला. आंदोलन स्थळी माजी नगरसेवक किशोर भेगडे,भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, दिलीपराव राजगुरू, निवृत्ती फलके, तळेगाव शहर भाजपा माजी अध्यक्षअशोक दाभाडे आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
Lohagad:लोहगड शिवप्रेमींचे शिवतीर्थ व्हावे
Anti-Corruption Department : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन; “लाच मागणाऱ्यांची तक्रार तात्काळ करा!”
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना फोन करून जाहीर पाठिंबा दिला.