मावळ ऑनलाईन –तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचालित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Talegaon Dabhade)मुले व मुली यांनी दि ३ व दि ४ ऑक्टोबर या दिवशी बालेवाडी येथे झालेल्या तालुकास्तरीय ऍथलेटिक क्रीडा स्पर्धेत विविध पारितोषिके पटकावून शाळेची मान उंचावली.श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे संपन्न झालेल्या मावळ तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत कृष्णराव भेगडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि ३ व शनिवार दि ४ झालेल्या विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान मिळवले. यामध्ये
मुले 14 वर्षाखालील गटात
लांब उडी कृष्णा मनोहर पाटील (प्रथम क्रमांक)
उंच उडी शर्व संदीप पारखी (प्रथम क्रमांक)
चार बाय शंभर मीटर रिले
(प्रथम क्रमांक)
Talegaon Dabhade: गोल्डन रोटरी तर्फे प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम
Uddhav Thackeray: शिवसेनेचे राजकारण सत्तेसाठी नाही – उद्धव ठाकरे




- वेदांत प्रमोद दुबळे
- सोहम संजीव म्हेत्रे
- शर्व संदीप पारखी
- कृष्णा मनोहर पाटील
17 वर्षाखालील गटातील मुले
लांब उडी हितेश महेंद्र शिरसाट (प्रथम क्रमांक)
उंच उडी दीपक सत्यदेव यादव (प्रथम क्रमांक)
अभयसिंग छबिनाथ चव्हाण (द्वितीय क्रमांक)
मुली- 14 वर्षे वयोगटाखालील
उंच उडी सानिका राहुल चौगुले (द्वितीय क्रमांक)
17 वर्षे वयोगटाखालील मुली
उंच उडी ईश्वरी अंबाजी बसर्गे प्रथम क्रमांक
1500 मीटर धावणे
प्रांजल रामदास नाटक ( प्रथम क्रमांक)
100 मीटर अडथळा
अंजली निलेश नलगे तृतीय क्रमांक
800 मीटर धावणे
ईश्वरी अंबाजी बसर्गे (तृतीय क्रमांक)
तीन हजार मीटर धावणे
तृप्ती जीवन विराट व विठ्ठल गायत्री कालेकर (तृतीय क्रमांक)
चार बाय 400 मीटर रिले
(प्रथम क्रमांक)
- गायत्री विठ्ठल कालेकर
- ईश्वरी अंबाजी बसर्गे
- तृप्ती जीवन विराट
- स्नेहल दादासाहेब अनभुले
17 वर्षाखालील मुले
पाच किलोमीटर चालणे स्पर्धा
कु. मृणेश कैलास मोरे (प्रथम क्रमांक)
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका टी. एन. साई लक्ष्मी, शाळेच्या उपमुख्याध्यापिका ज्योती सावंत, पर्यवेक्षिका नीता मगर व सोनाली कदम तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी खूप खूप अभिनंदन केले.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाच्या मागे त्यांच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यामध्ये अशपाक मुलाणी,बबन पिलाणी,अविनाश पवार या सर्व क्रीडा शिक्षकांनी गेल्या काही महिन्यात या विद्यार्थ्यांचा खूप सराव घेतला व त्यांच्या मेहनतीला फळ प्राप्त झाले. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक संस्थेच्या वतीने करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देखील देण्यात आल्या.