situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dolasnath Maharaj : विजया दशमी निमित्त श्री डोळसनाथ महाराज छबिना पालखी सोहळा उत्साहात संपन्न

Published On:
Dolasnath Maharaj

मावळ  ऑनलाईन –  विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज ( Dolasnath Maharaj ) यांचा पारंपरिक छबिना पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.

सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी विश्वस्त राजेश पिराजी सरोदे व उत्सव समिती अध्यक्ष अविष्कार अशोक भेगडे यांच्या हस्ते श्रींची आरती होऊन पालखीचे प्रस्थान झाले. नगारा, संभाळ, शिंगाड, शंख, डमरू, टाळ-मृदुंग यांच्या गजरात, ज्ञानोबा-तुकारामच्या नामस्मरणात महिला भजन मंडळी, मानकरी भोई समाज बांधव, भराडी, गोंधळी, ग्रामपुरोहित रेडे, गुरव पुजारी, डोळसनाथ महाराज ट्रस्ट, उत्सव समिती, तालीम मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी ( Dolasnath Maharaj ) झाले.

Granthottejak Award : यशासाठी ग्रंथविक्रेत्याने वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक-संजय भास्कर जोशी

पालखीने सीमोल्लंघन करून ग्रामप्रदक्षिणा केली व मंदिरात परतल्यावर श्रींची महाआरती झाली. यानंतर शारदीय नवरात्रोत्सव व छबिना पालखी सोहळ्याची सांगता झाली.

पालखी मार्गावर तळ्याकाठी सालाबादप्रमाणे कै. शंकर वस्ताद कुंभार परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. पालखीपुढे नगारा, घोडे, विद्युत रोषणाईने सजविलेल्या छत्र्या, ऐतिहासिक वेशातील तलवारधारी वीर, दानपट्टा धारक गोंधळी-भराडी यांची उपस्थिती सोहळ्याचे आकर्षण ठरली. गावकऱ्यांनी औक्षण करून, रांगोळ्या काढून महाराजांचे स्वागत( Dolasnath Maharaj ) केले.

Maharashtra Elections : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती निवडणुकांसाठी 8 ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार

मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने व विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत सप्तशती पाठ, भोंडला, कुमारिका पूजन, हळदीकुंकू, देवीचा जोगवा, स्त्रीसूक्त पठण, दीपप्रज्वलन, कालभैरवाष्टक आरती व नवचंडी याग अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ( Dolasnath Maharaj ) करण्यात आले होते.

Follow Us On