मावळ ऑनलाईन –शहरातील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये अविष्कार २०२५ स्पर्धेचे (Talegaon Dabhade)नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. यात अभियांत्रिकी शाखेतील ३० गटांनी यात सहभाग नोंदवत संशोधनाभिमुख प्रकल्प, तांत्रिक संकल्पना तसेच सामाजिक भान व्यक्त करणारे विषय प्रभावीपणे मांडले.
यावेळी विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेसाठी ग्रीन मील : एक डिजिटल अन्न सुरक्षा सहाय्यक कल्याण मंच,अॅग्री-कनेक्ट : शेतकरी आणि ग्राहकांमधील अंतर कमी करण्यासाठी प्रकल्प आणि महिला सक्षमीकरण : महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाय या तीन गटांची निवड करण्यात आली. संस्था स्तरावरील एम. के. शेख, डॉ. संजीवकुमार अंगडी, डॉ. अमोल सोनवणे आणि प्रा. अनिरुद्ध डुबल यांनी परीक्षण केले. तर विभागीय स्तरावरील डॉ. विकास यादव, डॉ. महेश वानखेडे, डॉ. चंद्रकांत कोकणे, डॉ. रेणुका गोंड, डॉ. रोहिणी हंचाटे, डॉ. धनश्री कुलकर्णी व प्रा. विवेक नागरगोजे यांनी यांनी परीक्षण केले.
Talegaon: अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकास अटक
Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून शहरातील 70 हजार विजेचे खांब हटवणार
यावेळी विभागीय समन्वयक म्हणून डॉ. कोटेश्वरराव सीलम, डॉ. अनुज खोंड, प्रा. दीपिका परांजपे, प्रा. रविंद्र गहाणे, प्रा. प्रितम अहिरे, प्रा. धम्मज्योती धवसे, प्रा. अजय सोनवणे, प्रा. सारिका पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. विलास देवतारे, अधिष्ठाता डॉ. सागर शिंदे, डॉ. नितीन धवस आणि डॉ. सतीश मोरे यांचे विशेष योगदान लाभले. या कार्यक्रमासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. एस एन सपली व सीइओ डॉ. आर एस जहागीरदार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. सर्व विभागांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ही स्पर्धेची खास वैशिष्ट्ये ठरली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. दिग्विजय पाटील व प्रा. विजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.