मावळ ऑनलाईन –देहू येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने एका टपरीवर कारवाई (Dehu)करत सात हजार २७९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (१ ऑक्टोबर) दुपारी करण्यात आली.
विष्णू एकनाथ वाघ (५४, देहू) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बागसिराज जावेद यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Gurwar Peth Crime : गुरुवार पेठेतील सराफा पेढी चोरी प्रकरणात एक आरोपी उत्तर प्रदेशातून अटक, 36 किलो चांदी जप्त
Talegaon: अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू याने त्याच्या पान टपरी मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत सात हजार २७९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.