मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- शालिवाहन शके १९४७. विश्वावसुनाम संवत्सर. महिना: अश्विन, शुक्लपक्ष. तिथी – ११. तारीख – ०३.१०.२०२५. वार – शुक्रवार. (Rashi Bhavishya 3 Oct 2025)
शुभाशुभ विचार – १८ नंतर चांगला दिवस.
आज विशेष- पाषांकुशा एकादशी.
राहू काळ – दुपारी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- श्रवण ०९.३५ पर्यंत नंतर धनिष्ठा. चंद्र राशी – मकर २१.१८ पर्यंत नंतर कुंभ.
मेष – ( शुभ रंग – हिरवा) Rashi Bhavishya 3 Oct 2025
नोकरीच्या ठिकाणी काही वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आज फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. रिकामटेकड्या मित्रांना लांबच ठेवा.
वृषभ ( शुभ रंग- डाळिंबी)
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. आज शासकीय नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. ध्येयपूर्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. दानधर्म कराल.
मिथुन – ( शुभ रंग- भगवा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने आज प्रतिकूल दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. व्यावसायिकांनी मोठ्या आर्थिक उलाढाली टाळाव्यात.
कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)
आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही कसलाही शब्द देऊन त्यात अडकू नका. आज जोडीदाराच्या मताचा आदर करा.
Vijaya Dashmi : श्रीमंत सरसेनापती दाभाडे राजघराण्याच्या शस्त्रपूजनाचा पारंपरिक सोहळा उत्साहात
सिंह -( शुभ रंग – जांभळा) Rashi Bhavishya 3 Oct 2025
आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या प्रश्नात जाणकारांचे मत अवश्य घ्यावे. आज मौजमजा करताना कायद्याचे भान असावे.
कन्या – ( शुभ रंग- पांढरा)
तरुणांच्या मध्ये चैनी व विलासी वृत्ती बळावेल. मॉलमधील ब्रँडेड वस्तू आज गृहिणींना आकर्षित करतील. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील.
तूळ ( शुभ रंग- तांबडा)
मुले आज मन लावून अभ्यास करतील. घरात सज्जनांची उध्वस्त राहील. गृहिणींना लघु उद्योगातून आज चांगली मिळकत होईल. आज आईच्या मनाचा आदर करा.
वृश्चिक ( शुभ रंग – आकाशी)
आज राशीच्या पराक्रम स्थानात चंद्र असताना चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. लहान भावाला आज मदत करावी लागेल. घराबाहेर वाद टाळा.
Eknath Shinde Dasara Melava : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल -एकनाथ शिंदे
धनु (शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 3 Oct 2025
विविध मार्गाने पैसा येईल. आज आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. विवाह विषयक बोलणी आज होकारार्थी पार पडू शकतील.
मकर (शुभ रंग- निळा)
पूर्वी केलेली गुंतवणूक चांगला लाभ देईल. आज एखादी हरवलेली वस्तू सापडेल. मुले आज्ञेत वागतील. आज वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)
खर्च कितीही वाढला तरी आज आवकही तितकीच वाढेल. तुमची मोठ्या लोकांमध्ये उठबस फायदेशीर राहील. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल.
मीन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आवडते छंद जपण्यासाठी वेळ काढता येईल.
शुभम भवतु!
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424