मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील श्रीमंत सरसेनापती दाभाडे राजघराण्याच्या वतीने विजयादशमी (Vijaya Dashmi) निमित्त पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी दाभाडे घराण्याचे राज-पुरोहित अतुल रेडे यांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करण्यात आले.
शस्त्रपूजनाचा मान सत्यशील राजे दाभाडे यांनी पारंपरिक पद्धतीने बजावला. त्यावेळी राजमाता वृषाली राजे दाभाडे तसेच दिव्यलेखा राजे दाभाडे यांचीही उपस्थिती होती. शस्त्रपूजनानंतर उपस्थित मान्यवरांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Talegaon Dabhade News : तळेगावात आदर्श महिला शिक्षकांचा सन्मान
दसऱ्याच्या निमित्ताने (Vijaya Dashmi) पारंपरिक शस्त्रपूजन हा दाभाडे घराण्याचा जुना लौकिक आहे. मराठा साम्राज्यात श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे हे सरसेनापती होते. पेशव्यांच्या आधी छत्रपतींच्या सेनेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दाभाडे घराण्यावर होती. त्यांच्या पराक्रमामुळेच मुघलांविरुद्धच्या युद्धात मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. हा वारसा आजही दाभाडे घराणे जपत असून, दरवर्षी पारंपरिक रीतीने शस्त्रपूजनाचा सोहळा साजरा केला जातो.
Eknath Shinde Dasara Melava : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल -एकनाथ शिंदे
शस्त्रपूजनाच्या या सोहळ्यामुळे तळेगाव दाभाडे येथे दसऱ्याचा उत्साह अधिकच रंगतदार झाला. परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे या परंपरेचा आनंद लुटला.