मावळ ऑनलाईन – शिक्षकांचा सन्मान हा त्यांच्या ज्ञानदानातून ( Talegaon Dabhade News) हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविलेल्या कार्याचा आहे. विद्यार्थी, पालकांनी शिक्षकांविषयी कायम कृतज्ञ राहिले पाहिजे, असे प्रतिपादन द रॉयल एज्युकेशन फाउंडेशनच्या संचालक याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार यांनी रविवारी तळेगावात आयोजित समारंभ प्रसंगी केले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील शेळके, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे आणि महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत( Talegaon Dabhade News) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष शबनम खान आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीने वतननगर येथे नवदुर्गा सन्मान या समारंभाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माँसाहेब वृषालीराजे दाभाडे सरकार होत्या.

Ekveera Devi : आई एकवीरा देवीच्या गडावर महानवमी होमाने नवरात्रोत्सवाची सांगता
अंबिका पार्कमधील इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या( Talegaon Dabhade News) या समारंभात सरसेनापती दाभाडे सरकार घराण्यातील माँसाहेब वृषालीराजे दाभाडे आणि वाहिनी साहेब याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार यांच्या हस्ते आदर्श महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सलमा अस्लम शेख, सुरेखा तुळशीराम जाधव, रेखा रामसिंग परदेशी, रुख्मिणी पांडुरंग काळे, जयश्री बाळासाहेब गोडसे, शमशाद आमिर हमजा शेख आणि नगरपालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या मुख्याध्यापिका वर्षा गोरख थोरात (काळे) यांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
वृषालीराजे दाभाडे म्हणाल्या, की पुणे शिक्षणाचे माहेरघर होण्यापूर्वी तळेगाव दाभाडे येथील बहुजनांच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी दाभाडे सरकार घराण्याने मोठे योगदान ( Talegaon Dabhade News) दिले होते. तत्कालीन अनेक घडामोडींच्या ओघात जरी या ऐतिहासिकनगरीच्या विसर पडला. मात्र शिक्षकांनी हा वारसा लक्षात ठेवून विद्यादानाचे काम अधिक पुढे न्यावे. यावेळी शबनम खान, शैलेजा काळोखे, वीणा करंडे, प्रिया मोडक, मनिषा रघुवंशी यांची भाषणे झाली. रुख्मिणी काळे, सलमा शेख, रेखा परदेशी आदी शिक्षकांनी सत्काराला उत्तर देताना आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविक पूनम उबाळे यांनी केले. सूत्रसंचालन हिना शेख यांनी केले. अल्पसंख्याक पदाधिकारी नसीमा मुलाणी, नाझिया शेख, शहनाज शेख ,फरहाना शेख, अनिसा शेख आदींनी संयोजन केले. वैष्णवी उबाळे यांनी आभार ( Talegaon Dabhade News) मानले.