situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Indrayani Vidyamandir Institute : इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास काकडे, तर कार्यवाहपदी चंद्रकांत शेटे यांची एकमताने फेरनिवड

Published On:
Indrayani Vidyamandir Institute

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर

मावळ ऑनलाईन – शिक्षण क्षेत्रातील एक नामांकित संस्था असलेल्या ( Indrayani Vidyamandir Institute) तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यमंदिर संस्थेची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंगळवारी (30 सप्टेंबर) झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी जेष्ठ उद्योजक रामदास काकडे व कार्यवाहपदी चंद्रकांत शेटे यांची एक मतांनी फेरनिवड करण्यात आली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली.

Satyam Khandge : आमदार शेळके यांनी जाहीर केली सत्यम खांडगे यांची उमेदवारी

कार्यकारिणी पदांमध्ये खांदेपालट करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी ( Indrayani Vidyamandir Institute) ज्येष्ठ उद्योजक संजय साने व शैलेश शहा यांची, तर खजिनदारपदी निरूपा कानिटकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मावळ तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Pune:शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन

संस्थेचे नूतन अध्यक्ष रामदास काकडे यांच्या दूरदृष्टीमुळेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने गरुडभरारी घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हे कॉलेज सुरू झाले आहे. तसेच गेल्या पाच-सहा वर्षात कृष्णराव भेगडे फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च बी.फार्मसी व डी.फार्मसी महाविद्यालये सुरू केली. आठ एकरमध्ये खेळाचे भव्य मैदान आणि १५ एकराच्या सुशोभित कॅम्पसमधून सुमारे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंद्रायणी महाविद्यालयही बीएससी कॉम्प्युटर सायन्स, पीएच.डी.चे संशोधन केंद्र यासारखे अनेक अभ्यासक्रम नव्याने सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कांतीलाल शहा इंग्लिश मीडियम स्कूल, श्री. संत तुकाराम विद्यालय, श्रीराम विद्यालय या शाळांमध्ये देखील नव्याने विस्तारित वर्गखोल्यांची कामे झालेली आहेत. लवकरच इंद्रायणी विद्या मंदिर संस्था इंद्रायणी विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ( Indrayani Vidyamandir Institute)

संस्थेची कार्यकारणी खालीलप्रमाणे :
रामदास महादेव काकडे (अध्यक्ष)
चंद्रकांत दामोदर शेटे (कार्यवाह )
संजय विष्णू साने ( उपाध्यक्ष)
शैलेश कांतीलाल शहा (उपाध्यक्ष)
निरुपा सुहास कानिटकर (खजिनदार)
संजय विश्वनाथराव भेगडे (सदस्य)
गोरखनाथ रघुनाथ काळोखे (सदस्य)
दीपक विनोदकुमार शहा (सदस्य)
गणेश वसंतराव खांडगे (सदस्य)
विलास बबनराव काळोखे (सदस्य)
संदीप चंद्रकांत काकडे (सदस्य)
युवराज बाळासाहेब काकडे (सदस्य)
रणजीत रामदास काकडे (सदस्य)

Follow Us On