मावळ ऑनलाईन – तळेगाव शहरातील तळेगाव चाकण रोडवर ( Hunger Strike)अनेक मोठमोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये पडून अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना अनेकदा सदर खड्ड्यांबाबत दुरुस्ती करण्याची मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हताश तळेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९७ लाख ५० हजारांची फसवणूक
तळेगाव चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून सेवाधाम हॉस्पिटल समोर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रचंड अपघात होत असून अनेकांचे बळी तळेगाव चाकण रोडवर गेलेले आहेत आणि एकदा तक्रार करून सुद्धा पीडब्ल्यूडी विभाग खड्डे भरून काढत नाही. त्यामुळे आमरण उपोषण करत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे( Hunger Strike) नमूद केले आहे.
Nitin Mapari : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नितीन मापारी यांचे निधन
बेमुदत उपोषण करण्यासाठी कल्पेश भगत, नितीन जांभळे, मिलिंद अच्युत, सुनील उर्फ मुन्ना मोरे, सचिन देशपांडे आदी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. चाकण तळेगाव महामार्ग कृती समितीचे दिलीप डोळस, चिराग खांडगे, अरुण माने, प्रा. नितीन फाकटकर, विशाल वाळुंज, देवा खरटमल, प्रा शैलेश गजभिव, समीर खांडगे आदी सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांनी खड्ड्यांचा प्रश्न तडीस ( Hunger Strike) नेण्यासाठी कंबर कसली आहे.